Breaking

My Blog List

Tuesday, April 4, 2023

शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

 





कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो.

देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांनी सावरल्याचं समोर आलं होते. शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठे काढायचं. शेतकरी प्रमाणपत्राचा फायदा नेमका काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते. (How to get agriculturist certificate from Aaple Sarkar)

शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

इतर कागदपत्रे

शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा 7/12 किंवा 8 अ उतारा उपलब्ध असणं आवश्यक आहे.

स्वंयघोषणापत्र

शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल.

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate