Breaking

My Blog List

Tuesday, April 4, 2023

खेड्या गावात मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात

 

खाली दिलेल्या महत्त्वाच्या बाबी

  • मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे काय ?
  • मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • विवाह नोंदणी फॉर्म कुठे मिळेल
  • विवाह नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतात का ?
  • विवाह नोंदणी कोठे करतात ? 

लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा विवाहनोंदणी ही प्रत्येकाला करावी लागते आणि खेळा गावात ह्या गोष्टींकडे सहसा दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळेच खेड्या गावातील लोकांना माहिती नसते की विवाहनोंदणी हा प्रकार काय आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट काय आहे.

 ते कसे काढावे लागते या या सर्व गोष्टी खेड्या गावातील लोकांना माहित नसतात परंतु मॅरेज सर्टिफिकेट कसे काढतात त्याच्या साठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात मॅरेज सर्टिफिकेट काढत असताना पैसे द्यावे लागतात का आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो तो कसा डाउनलोड करायचा ते आपण पाहणार आहोत.

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे काय ? ( What is marriage certificate in Marathi)

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लग्न झाल्यानंतर कायदेशीर केलेली नोंदणी आणि नोंदणी केल्यानंतर जे सर्टिफिकेट भेटते त्याला त्याला मॅरेज सर्टिफिकेट असे म्हणतात. मॅरेज सर्टिफिकेट के एक लग्नाचा पुरावा म्हणून असतं की जी दोन लोक लग्नाच्या बंधनात अडकलेले असतात त्यांचा एक कागदोपत्री पुरावा असतो की त्या शहरात किंवा त्या गावात त्यांच्या लग्नाची नोंदणी केलेली असते. हेच मॅरेज सर्टिफिकेट आपण लग्न झाल्यानंतर मुलीच्या मागे बापाचे नाव काढून तिच्या नवऱ्याचे नाव लावण्यासाठी वापरता येते कारण लग्नाचा पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरले जाते.


मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (marriage certificate document list in Marathi)

1. वधू आणि वराचे फोटो

2. वधू-वराचे आधार कार्डची झेरॉक्स

3. वधू आणि वराचे शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स

4. लग्नात उपस्थित असलेले तीन साक्षीदार व त्यांचे तीन फोटो आणि आधार कार्ड चे झेरॉक्स.

5. लग्नपत्रिका

6. लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो

7. ब्राह्मणाची नावासह माहिती

8. विवाह नोंदणी फॉर्म


विवाह नोंदणी फॉर्म कुठे मिळेल ( marriage certificate form download in Marathi )

मित्रांनो तुम्हाला सोयीचे व्हावे त्याच्यासाठी मी विवाह नोंदणी फॉर्म तयार केलेला आहे आणि हा फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता How to download marriage certificate form

विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

👉 Download Form

विवाह नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतात का ? ( Marriage certificate fee)

तर विवाह नोंदणी करत असताना तुम्ही जर का लग्न झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्याच्या आत विवाह नोंदणी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही.परंतु जर का तुम्ही लग्न झाल्यानंतर सहा महिने किंवा एका वर्षानंतर विवाह नोंदणी करायला गेला तर तुम्हाला फी द्यावी लागते.


विवाह नोंदणी कोठे करतात ? (Marriage registration in Maharashtra)

विवाह नोंदणी ही, जर तुमचे लग्न खेड्या गावात झाले असेल तर ग्रामपंचायतीमध्ये केली जाते.

तुमचे लग्न जर का बाहेर कुठे मंदिरात संस्थेत झाले असेल तर त्या ट्रस्ट कडून तुम्हाला विवाह नोंदणी किंवा मॅरेज सर्टिफिकेट मिळते.

तुमचे लग्न जर का शहरात झाली असेल तर सरकारी दवाखान्यातून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट घ्यावे लागते ,किंवा त्या शहरातील नगर पालिका किंवा महानगर पालिका येथे मिळेल.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate