वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र कुठे मिळते?
वय ,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील शासन मान्यता अधिकृत सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता.
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा
पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं
पत्ता दर्शवणारा पुरावा
पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं अर्जदार 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचं डोमासाईल प्रमाणपत्र, शाळा प्रवेशाचा पुरावा,
रहिवासी दाखला
तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असतो.
स्वंयघोषणापत्र
डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.
आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात शासन मान्यता अधिकृत सेतू केंद्रात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल आणि तुम्हाला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळून जाईल.
15 दिवसांमध्ये प्रमाणपत्र
आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर शासन मान्यता अधिकृत सेतू केंद्रात जाऊन अपील अर्ज सादर करु शकता.
No comments:
Post a Comment