ठिबक सिंचन अनुदान तुषार सिंचन अनुदान योजना 2023 महाराष्ट्र: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने संबंधित शासन निर्णय GR ची माहिती आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यादी PDF पाहणार आहोत.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2023
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने ही योजना राज्यात दिनांक 19 ऑगस्ट 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती. ही योजना सन 2022-23 पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ५ हेक्टरच्या मर्यादित 45% अनुदान देण्यात येते. हे अनुदान या अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिले जाते. तसेच सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के एकूण अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
सन 2022-23 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत रुपये दोनशे कोटी निधी कृषी आयुक्त यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी शासन निर्णय घेतलेला आहे.
कृषी सिंचन शासन निर्णय
सन 2022-23 या वर्षांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने करिता रुपये दोनशे कोटी एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. हा निधी सन 2022-23 च्या मंजूर तरतुदीतून खर्च करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महाडीबीटी व PFMS प्रणालीवर करण्यात येणार आहे. या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आलेला निधी सण 2022-23 मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता वापरण्यात आणला जाणार आहे.
हा शासन निर्णय जीआर पीडीएफ पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊ शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन हा शासन निर्णय जीआर तुम्ही पाहू शकता.
ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना राज्यातील उर्वरित 107 तालुक्यांमध्ये राबवली जाणार
19 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण 14 जिल्हे 3 नक्षलवादी जिल्हे व अशा 17 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबवण्यात येत आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये देखील ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधिन होता. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी च्या शासन निर्णयामध्ये या संबंधित विचार करून निर्णय दिलेला आहे.
शासन निर्णय
19 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्हे 3 नक्षलवादी जिल्हे अशा 17 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होता. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील आवर्षण प्रणव तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. आता या शासन निर्णयानुसार राज्यातील उर्वरित 107 तालुक्यांचा योजनेमध्ये समावेश करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.
107 तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी 18 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्यात आलेली आहे. या तालुक्यांची यादी शासन निर्णयांमध्ये दिली गेलेली आहे. ती यादी पाहण्यासाठी तुम्ही खालील जीआर लिंक वर जाऊ शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन हा शासन निर्णय जीआर तुम्ही पाहू शकता.
No comments:
Post a Comment