महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी...
योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
- अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा/ 3.अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- अर्जदारदि.०१.०१.२०२४ या अहर्ता दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
- मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील ६. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्नरु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे
- लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या (Escort)सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल
- अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे
- जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल, अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तरतो थकबाकीदार नसावा.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील दस्तऐवज तयार
ठेवणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची सही
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- निवासी पुरावा
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
- UDID प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- बैंक पासबुकचे पहिले पान.
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे.
- सूचना वाचणे
- प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी (साइन-अप)
- ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे
- अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे
- फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे
- अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती
पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्याने या सूचना वाचणे आवश्यक आहे. प्रथमच वापरकर्त्याने नोंदणी/लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास साइन-अप साइन-इन पृष्ठावर निर्देशित केले जाईल. ओटीपी पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर,नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल ओटीपी सत्यापन झाल्यावर पुढील अर्ज भारता येईल.
केंद्र शासन ते गाव पातळी पर्यंत सर्व शैक्षणिक, नौकरी, शेती योजना, व्यवसाय विषयक सर्व योजनाच्या अनुदान माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
या सारख्या विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती ची अपडेट मिळविण्यासाठी जॉइन करा.
No comments:
Post a Comment