Breaking

My Blog List

Friday, February 3, 2023

शिष्यवृत्त्या मिळविण्याचे महाद्वार व शिष्यवृत्ती साठी लागणारी कागदपत्रे.

  शिष्यवृत्त्या मिळविण्याचे महाद्वार व शिष्यवृत्ती साठी लागणारी कागदपत्रे…




           सन २०१७-१८ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी असे असून हे पोर्टल https://mahadbtmahait.gov.in/ कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

महाडीबीटी पोर्टल : विविध शिष्यवृत्त्या मिळविण्याचे महाद्वार..
आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि शिक्षण फी तसेच इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत असे. आता मात्र विद्यार्थ्यांना देय होणारी वित्तीय लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

         सन २०१७-१८ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी असे असून हे पोर्टल https://mahadbtmahait.gov.in/ कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. अर्ज ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती शाळा आणि महाविद्यालयांनी दर्शनी भागात लावण्याबाबत आणि पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

          विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्या वेतने विषयक योजनांचा लाभ मिळणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी (DBT) पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सूचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाला देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असणार आहे.

महाडीबीटी पोर्टल दिनांक ३ ऑगस्ट २०१७ पासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे आता विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना ऑनलाईन प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून पारदर्शकता वाढणार आहे. सन २०१७-१८ पासून विद्यार्थ्‍यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्‍ट्र शासनाकडून नव्‍याने तयार करण्‍यात आलेल्‍या राज्‍यस्‍तरीय डीबीटी पोर्टल Mahadbt Portal https://mahadbtmahait.gov.in/ वर आलेल्‍या युजर मॅन्‍युअल एफएक्‍यूचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने व पोर्टलवर दिलेल्‍या सूचनांचे पालन करुन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. ज्‍या विद्यार्थ्‍यांचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नित नाहीत, त्‍यांनी जवळच्‍या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्‍न करुन घ्‍यावे. या योजनांचा लाभ घेण्‍यासाठी अर्ज करण्‍याची कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनाही शिक्षण संचालनालयाने जारी केल्या असून योजनांच्‍या पात्रतेचे निकष व संबंधित शासन निर्णय https:/mahadbt.gov.in वर ज्ञान बँक (Knowledge Bank) याठिकाणी उपलब्‍ध आहेत. या योजनांची मंजूर रक्‍कम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आधार संलग्नित बँक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात येईल. पात्र प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांने स्‍वतंत्र युजर आयडी तयार करुन ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे.

महा डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजना देण्यात येणारे विभाग
1.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
2.आदिवासी विकास विभाग
3.उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग
4.अल्पसंख्याक विकास विभाग
5.शालेय शिक्षण विभाग

डीबीटी (DBT) पोर्टलवर नोंदणी करण्याची पद्धत –
अ) ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारी :-
• विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे.
• विद्यार्थ्यांनी कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे.
• विद्यार्थ्यांनी आपला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, १०वी, १२वी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, दिव्यांग (अपंग) असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधापत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.

ब ) डीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करावी :-
• आपण कोणत्याही ब्राऊझरचा वापर करुन (उदा. Internet Explorer, Google Chrome / Mozilla firefox इ.)
• पुढे https://mahadbtmahait.gov.in/या वेबसाईटवर जाऊन ‘नवीन नोंदणी’ या बटनावर क्लिक करावे.
• प्रत्येक विद्यार्थ्याने (ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी e-scholarship पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यांनी सुद्धा) mahadbt पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. त्यासाठी ‘आधार कार्ड आहे?’ असेल तर ‘होय’ व नसेल तर ‘नाही’ वर क्लिक करावे.
• त्यानंतर ‘OTP’ हा पर्याय निवडा.
• वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर ‘OTP पाठवा’ बटन क्लिक करावे.
• मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी (One Time Password) टाकून ‘पडताळणी करा’ हे बटन क्लिक करावे.
• उपलब्ध विंडोमध्ये नाव, जन्म दिनांक, फोन नंबर, पत्ता आधार संलग्न बँक खाते नंबर इ. आधार कार्डवरील माहिती आपोआप दिसेल.
• आधार क्रमांक नसल्यास ‘आधार कार्ड नाही’ हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावीत.
• नोंदणी अर्जाच्या विंडोमधील सर्व माहिती भरावी.
• स्वत: चा User Name व Password तयार करावा.

क) डीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा :-
• महाडीबीटी पोर्टलवर Log in करण्यासाठी ‘Select User’ वर जाऊन ‘विद्यार्थी’ हा पर्याय निवडा.
• User Name व Password टाकून Log in व्हावे.
• Log in झाल्यावर Windows मधील ‘योजना तपशील’ यावर क्लिक करावे. त्यानंतर विभागवार योजना आपण पाहू व निवडू शकाल.
• तुम्हास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्यायोजनेसमोरी ‘पहा’ यावर क्लिक करावे.
• तुम्ही कोणत्या योजना जसे. मॅट्रिकपूर्व/मॅट्रिकोत्तर (शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर) नुसार पर्याय निवडावा.
• आपली आवश्यक माहिती भरावी जसे. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, अपंगत्व, कौटुंबीक उत्पन्न, इ.
• पालकाची माहिती, शाळा/महाविद्यालयाची माहिती भरावी.
• आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अभ्यासक्रमाचा तपशील इ. माहिती भरुन Submit बटनवर क्लिक करावे.



महाडीबीटी पोर्टलचा लाभ :
‘आधार प्रमाणिकरण’ सह थेट लाभ देण्यासाठी या प्रणालीची सुरूवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
• राज्यातील सर्व विभागांमधील विविध योजनांच्या अंतर्गत लाभार्थींना महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभ
• हे पोर्टल डीबीटी आणि सेवा प्रक्रियांच्या विविध अंतर्गत कार्यांमध्ये कार्यक्षमता आणेल
• विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करु शकतात
• लाभार्थी फक्त ‘आधार प्रमाणीकरण’ वापरून अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात.
• योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बराच काळ थांबण्याची आवश्यकता नाही
• लाभार्थींना आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कोणाला लाच देण्याची गरज नाही.
महाडीबीटी पोर्टलद्वारे सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित केला जाईल. ही आधार-प्रमाणीकृत इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे ज्यामुळे राज्यातील विविध विभागांद्वारे अंमलात आणलेल्या ४० हून अधिक योजनांच्या फायद्यांचे थेट हस्तांतरण करण्यास मदत होणार आहे.

शिष्यवृत्ती साठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड
बँक पासबुक
डोमासाईल सर्टिफिकेट
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
प्रवेश पावती किंवा बोनाफाईड
मागील वर्षाचे गुणपत्रक
10वी गुणपत्रक
12वी गुणपत्रक
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate