Breaking

My Blog List

Friday, February 3, 2023

महालक्ष्मी कॉम्प्युटर सेंटर सर्व्हिसेस या पोर्टलची उद्दिष्ट्ये

महालक्ष्मी कॉम्प्युटर सेंटर वरखेड
उद्दिष्ट्ये:

महालक्ष्मी मल्टी सर्व्हिसेस या पोर्टलची खालील उद्दिष्ट्ये आहेतः

नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.
महालक्ष्मी मल्टी सर्व्हिसेस हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणार्‍यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. महालक्ष्मी मल्टी सर्व्हिसेस उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते.

कोविड-१९ हे केवळ आरोग्य संकट नव्हे तर आर्थिक संकट म्हणून जागतिक पातळीवर ओळखले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५% वाटा म्हणून देशातील सर्वाधिक उद्योग असणार्‍या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगप्रेमी ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या संकटाला उत्तर देताना उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा भागविणे आवश्यक आहे.

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महालक्ष्मी मल्टी सर्व्हिसेसचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महालक्ष्मी मल्टी सर्व्हिसेस पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate