Breaking

My Blog List

Sunday, February 5, 2023

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गाई, म्हैस, शेळी, मेंढी, कुकुटपालन इ. योजनेसाठी जर आपली निवड झालेली मेसेज आलेला असेल तर खलील कागद - पत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

 नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत गाई, म्हैस, शेळी, मेंढी, कुकुटपालन इ. योजनेसाठी जर आपली निवड झालेली मेसेज आलेला असेल तर खलील कागद - पत्र अपलोड करणे आवश्यक आहे. 




योजनेचे नाव - जिल्हास्तरीय योजना - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे- 2 गाई / म्हशीचे वाटप करणे

 योजनेचे नाव - राज्यस्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप करणे- 10 शेळी + 1 बोकड /10 मेंढी + 1 मेंढा

१. सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.
२. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दि.23/02/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
३. प्रणालीमार्फत SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
४. दि. ३.०२.२०२३ पर्यंत निवड झालेल्या लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल व दि. ४.०२.२०२३ पासून कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थी साठी Online अर्ज मागवणे २०२२-२३

दिनांककामाचा तपशीलएकुण दिवस / कालावधी
३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना SMS पाठवणे
४ फेब्रुवारी २०२३ ते 23 फेब्रुवारी २०२३मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे
१२ फेब्रुवारी २०२३राखीव1
१३ ते २0 फेब्रुवारी २०२३पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे8
२१ फेब्रुवारी २०२३राखीव1
२२-२३ फेब्रुवारी २०२३लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता2
२४ फेब्रुवारी २०२३कागदपत्रे अंतिम पडताळणी1
२५ फेब्रुवारी २०२३राखीव1
२६ फेब्रुवारी २०२३अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार1



* असे चिन्ह असलेले कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. 

* फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )

* 7/12  सातबारा (अनिवार्य)

* ८ अ उतारा (अनिवार्य )

* अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र

* आधारकार्ड (अनिवार्य )

* रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )

* बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )

* राशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )

* ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा

* अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

दिव्यांग असल्यास दाखला (अनिवार्य )

बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

शैक्षणिक पात्रतेचा दाखला

रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत

प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

More Information Visit Mahalaxmi Computer Center Warkhed

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews

Translate